सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धेला मिळतय खतपाणी...!  - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 27, 2022

सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धेला मिळतय खतपाणी...! 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धेला मिळतय खतपाणी...! 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्याचे युग हे सोशल मीडियाचं माहिती तंत्रज्ञानाचा स्पर्धेचे युग आहे.
या युगामध्ये व्हाट्सअप ट्विटर इंस्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटमुळे सर्व संदेशाची जगभरामध्ये प्रचंड जलदगतीने आदान प्रदान होताना दिसत आहे.
एकाच वेळी अनेकांना ताबडतोब संदेश पाठवण्याची सोय व्हाट्सअप ट्विटरमुळे शक्य झालेली आहे.
एकंदरीत व्हाट्सअप ट्विटरमुळे आपल्या देशाबरोबर जगात डिजिटल क्रांती झाल्याचे दिसत आहे.
विज्ञानामुळे जग जवळ आले हे व्हाट्सअप ट्विटरने सिद्ध केलेले असून अनेक जण या सोशल नेटवर्किंगचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात पण काही विचित्र आणि कृतघ्न प्रवृत्तीचे लोक या सोशल नेटवर्किंगचा वापर जगामध्ये अंधश्रद्धा कर्मकांड पसरवण्यासाठी करत असल्याचे दिसत आहे.
सध्या व्हाट्सअप ट्विटर अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात खतपाणी घालणाऱ्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात.
त्यावर कळस म्हणजे ही पोस्ट पुढील पंधरा लोकांना पाठवा नाहीतर तुमच्या घरामध्ये अशुभ आणि वाईट घटना घडेल असा इशारा दिला जातो.
देवाच्या नावाने भावनिक पोस्ट टाकून इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी आणि मूर्ख प्रवृत्तीचे लोक करत असलेले दिसत आहेत.
ज्या माहिती तंत्रज्ञानामुळे व्हाट्सअप ट्विटर सारखी माध्यम आपल्या हातात आली त्याच माध्यमांचा उपयोग जर अंधश्रद्धा पसरवण्यासाठी होत असेल तर हे फार मोठं गौडबंगाल आहे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही.
वास्तविक पाहता अफवा पसरून अंधश्रद्धा पसरवून हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे.
सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करायला हवी.
त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा जागृत होऊन अशा पोस्ट टाकणाऱ्या लोकांचे नंबर पोलीसांना कळवून अशा पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीस चांगलाच धडा शिकविणे ही काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages