सौंदणे (कटूसत्य वृत्त):- कटारियन प्रशाला शिवाजीनगर पुणे या ठिकाणी पुणे विभागाचा संघ निवडला गेला. पुणे ,नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यातून सोळा वर्षाखालील बारा मुलींचा संघ निवडण्यात आला.यामध्ये नागनाथ विद्यालय मोहोळ येथील चार मुलींची निवड करण्यात आली.त्यात 1) पूजा अनिल राऊत 2)मंजुळा बालाजी सितारे3 )सह्याद्री काकासाहेब आवारे 4)कार्तिकी रामदास गरगडे या मुलींची सोलापूर विद्यापीठ येथे 24 व 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.या निवडीबद्दल मोहोळ तालुक्यातील सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे.सोलापूर जिल्हा असोसिएशन संघटनेचे सुदेश मालप,मनोत,अनिल यरगर,अनिल गिराम तसेच नागनाथ विद्यालयाचे प्राचार्य बशीर बागवान उपप्राचार्य शिंदे, राजमाने यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.तर तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण, समीर शेख,आबाराव गावडे,संतोष सिताप यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
0 Comments