Hot Posts

6/recent/ticker-posts

हिवाळी अधिवेशन म्हणजे नागपुरात फिरण्याचा छंद..! म्हणूनच सरकारने केला जयंत पाटलांचा आवाज बंद..!!

हिवाळी अधिवेशन म्हणजे नागपुरात फिरण्याचा छंद..! 
म्हणूनच सरकारने केला जयंत पाटलांचा आवाज बंद..!!
सोलापूर (दादासाहेब नीळ):- राज्यातील विविध प्रश्न आणि धोरणात्मक निर्णय मार्गी लावण्यासाठीच तर नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची परंपरा राज्यामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे.
परंतु सध्या या हिवाळी अधिवेशनामध्ये विकासाच्या प्रश्नाला बगल देऊन हे सरकार फक्त विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवित असल्याचे आरोप महाविकास आघाडीकडून व राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव सरकारने सत्तेच्या बळावर पास केला.
वास्तविक पाहता उध्दव ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना बोलण्यास अध्यक्षा परवानगी देण्याचे नाकारत असल्याचे पाहून व सत्ताधाऱ्यांचा सभागृहातील बेसिस्त पाहून जयंत पाटील यांनी असला निर्लज्जपणा करणं योग्य नाही असे सहज सर्व सभागृहाला सुनावले होते. असे जयंत पाटील यांनी पत्रकारांसमोर सांगितले. 
परंतु सरकारने या शब्दाचा विपर्यास करत जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करत विधिमंडळाचे कामकाज दोन तास रोखून धरल्यामुळे सरकारच्या या कृतीचा राज्यभरातून मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे.
अनावधानाने हा शब्द जयंत पाटलांकडून गेल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करून सुद्धा जयंत पाटील यांचे निलंबन सरकारने मागे न घेतल्याबद्दल सरकारच्या दंडेलशाहीचा आणि दडपशाहीचा सर्वत्र निषेध होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुसंस्कृत नेते म्हणून गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून विधिमंडळाचे अनेक प्रश्न अभ्यासूपणे हाताळणारे अभ्यासू नेते म्हणून जयंत पाटलांना ओळखलं जातं.
परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी आणि सरकारला विविध प्रश्न विचारून सरकारची विकेट घेणाऱ्या जयंत पाटलांना निलंबित करून सरकारने एक प्रकारे अधिवेशनामध्ये वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला आहे. असेही बोलले जात आहे.
राज्यातील सर्व प्रश्नांचा अभ्यास असणारे आणि अधिवेशन गाजवणारी मुलुख मैदानी तोफ म्हणून जयंत पाटलांकडे राज्यातील सर्व जनता पाहते.
ही तोफ निकामी करण्याचा सत्ताधारी मंडळीचा डाव जरी यशस्वी झालेला असला तरी सुद्धा लढवय्य जयंत पाटील यांनी निलंबनानंतर सुद्धा राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नासाठी जिवात जीव असेपर्यंत मी लढतच राहीन अशी गर्जना केलेली आहे.
नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा सातत्याने आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारकडून होत आहे.
सध्या राज्यामध्ये बेकारी, गुंडगिरी,  महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नागपूर भूखंड घोटाळा, महापुरुषांविषयी जबाबदार नेत्यांनी वापरलेले अवमानकारक शब्द आधी विषयांवर विधिमंडळात चर्चा होणे अपेक्षित असताना विरोधकांचा आवाज दाबण्याचे मोठे पाप या सरकारने केल्याचे दिसून येत आहे.
सर्वसामान्यांच्या विकासाच्या प्रश्नांना बगल देऊन दिशाभूल करणारे विषय सभागृहामध्ये उपस्थित करून सरकार वेळ वाया घालवत असल्याचा आरोप सुद्धा सध्या नागरिकांतून केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप आणि भ्रष्टाचाराबद्दल सभागृहामध्ये कोणतीही चर्चा होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मुलुख मैदानी तोफ जयंत पाटील यांना निलंबित केले असल्याचे बोलले जात आहे.
मुख्य विषय बद्दल कोणतीही चर्चा सभागृहात होऊ नये म्हणूनच शिंदे फडणवीस सरकार राज्यातील विरोधी पक्षातील आमदार आणि प्रमुख नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू लागल्यामुळे नागपुरातील अधिवेशन म्हणजे नागपूर फिरण्याचा केवळ छंद आहे की काय असाही सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
नेत्यांचा आवाज बंद केला तरी सर्वसामान्य जनतेचा आवाज कोणीच आणि कधीच बंद करू शकत नाही.
त्यामुळे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..? नाही..? असा प्रश्न राजाभरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यातून आणि नागरिकांतून विचारला जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments