Hot Posts

6/recent/ticker-posts

समता हायस्कूलचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश!!! 

समता हायस्कूलचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश!!! 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील समता हायस्कूलने मोहोळ येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत 17 वर्षे वयोगटात मुलाच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने या खेळाडूंचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
तसेच 14 वर्ष वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत सुद्धा मुलींनी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावल्यामुळे त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
समता हायस्कूलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले.
मुख्याध्यापक सयाजी गावडे, क्रीडाशिक्षक सखाराम साठे, कालिदास गावडे, आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक तसेच ग्रामस्थांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments