विधान भवनात उठला ठसका..!!
सोलापूर(दादासाहेब निळ):- संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर महापुरुषांविषयी राज्यातील जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे व भाजपाल असलेले राज्यपाल अवमानकारक वक्तव्य करू लागल्यामुळे राज्यातील सामान्य जनतेच्या मनात या झुंडशाही सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. याच तीव्र असंतोषाचे रूपांतर शाही फेकी मध्ये झाल्याचे पुण्यात दिसून आले.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द उच्चारून आपल्या बुद्धीचे दिवाळीखोरी संपूर्ण देशाला दाखवून दिली. आणि त्यांच्याच स्वयंघोषित सुसंस्कृत भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्याचे समर्थन करत कळसच करून टाकला.
थोर महापुरुषांनी समाजातील रंजल्या गांजलेल्यांच्या विकासासाठी अनंत हाल अपेष्टा सोसल्या.
आपण समाजाचं देण लागतो या भूमिकेतूनच समाज शिकला पाहिजे पुढे गेला पाहिजे प्रगतीच्या शिखरापर्यंत पोहोचला पाहिजे ही एकच विचारधारा घेऊन या महापुरुषांनी आपलं जीवन समाजासाठी वेचलं.
शोषित समाज सुधारला पाहीजे याच भावनेतून त्यांनी स्वतःच्याच जवळचे लाखो करोडो रूपयांच्या रोख स्वरुपात रक्कमा घालून, स्वतःच्याच शेत जमीनी, जागा देवून आणि काहींच्या सहकार्यातून अनेक शाळा महाविद्यालयाची निर्मिती करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
हे सर्व महाराष्ट्रातील सामान्य जनतेला सुद्धा माहित आहे.
परंतु राज्यातील जबाबदार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीर नगरीतले चंद्रकांत पाटील यांनाच या गोष्टीचा विसर पडल्यामुळेच त्यांनी या थोर महापुरुषांनी "भीक" मागून शाळा महाविद्यालय उभी केल्याचा गंभीर आणि खोडसाळ आरोप केल्यानंतर तमाम महाराष्ट्रातील छत्रपती, शाहू, फुले व आंबेडकरांच्या वाटेवरून जाणाऱ्या पुरोगामी माणसांच्या वज्रमुठी आवळल्या. राज्यातील भीम चळवळीत काम करणाऱ्या भीमसैनिकांनी तर चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करून त्यांच्यावर पुण्यात दिवसा शाही फेकून त्यांचे तोंड काळे केले.
बघता बघता ही बातमी संपूर्ण राज्यच नव्हे तर देशभरात ब्रेकिंग न्यूज झाली.
राज्यातील भीमसैनिक रस्त्यावर उतरल्यानंतर आता आपलं काही खरं नाही.
या गोष्टीचा विचार करूनच विधान भवनात शाही पेन वापरण्यास सुद्धा सरकारने बंदी घातल्याचं दिसून आलंय.
शिंदे-फडणवीस सरकारने शाही पेनला बंदी घालण्याऐवजी बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या जिभेला लगाम लावला पाहिजे अशा प्रतिक्रिया सध्या राज्यभरातून उमटत आहेत.
राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मी एका गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे कुठेही विना प्रोटेक्शन विना फिरू शकतो.
विरोधकांनी समोर येऊन बोलावे असे आव्हान दिले होते.
परंतु विधानभवनात शाई पेनला बंदी घातल्यामुळे नामदार चंद्रकांत पाटील यांचे आव्हान म्हणजे नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी होती असे ही बोलले जात आहे.
थोर महापुरुषांबद्दल एक जबाबदार मंत्री अशा पद्धतीने बोलत असेल तर याचा कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने अशा बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविणे गरजेचे असल्याचे सामान्य नागरिक आणि भीमसैनिकातून बोलले जात आहे.
अशा मंत्र्यांना पदावरून खाली खेचल्याशिवाय वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आळा बसणार नाही.
अन्यथा पुढील काळात शिंदे-फडणवीस सरकारला त्याचा फार मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही अशीही चर्चा राज्यात होताना दिसत आहे.
0 Comments