Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ जोडोमारो आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ जोडोमारो आंदोलन
                  
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अधिवेशनामध्ये माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रुपेश धोत्रे, व पदाधिकाऱ्यांनी मोहोळ तहसिल कार्यालया समोर जोडे मारून आंदोलन करण्यात आले. या जोडो मारो आंदोलनातुन भाजप सरकारला जाग यावी.तसेच  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संसटीय मर्यादा व परंपरा पाळणारा पक्ष आहे. सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांना बोलू दिले जात नाही.त्यांचा आवाज दडपला जातो.आज तर कहरच झाला. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार  सातत्याने विनंती करीत असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी ऐकले नाही. आणि माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्यासारख्या समंजस, ज्येष्ठ सदस्यांचे निलंबन करण्यात आले.
                   जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली सरकारचे अपयश उघड होईल या भीतीपोटी अध्यक्षांच्या मार्फत ही दडपशाही सुरु आहे.जनतेच्या प्रश्नांना सामोरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या या दडपशाहीचा निषेध. जनतेच्या प्रश्नांवर आमचा लढा सडक ते संसद सुरु राहिल असा इशारा यावेळी देण्यात आला.
                यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष हेमंत गरड, शहराध्यक्ष रूपेश धोत्रे, महिला शहराध्यक्ष यशोदा कांबळे,  मुश्ताक शेख,ओबीसी तालुकाध्यक्ष राजेश सुतार, अनंता नागणकेरी, संतोष खंदारे,अझरू६ीन शेख, जावेद बागवान, गौतम क्षिरसागर, उपाध्यक्ष राहुल कसबे, नागेश बिराजदार, अभय गायकवाड, सुरज तलफदार,अनिकेत सोनवणे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments