Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वैज्ञानिकवादी बानावे- काशीद 

विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वैज्ञानिकवादी बानावे- काशीद 
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गाडगे बाबा हे स्वतः शाळेत न जाता वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे व शिक्षणाचा प्रसार करणारे संत होते. असे उदगार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद यांनी केले . 
 राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टीकोन कार्यशाळेचे आयोजन देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय येथे बोलताना त्यांनी केले . त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. जे. पाटील हे होते, तर त्यावेळी एन.एस.एस. प्रमुख प्रा. समाधान गायकवाड प्रा भारत शिंदे, प्रा. राजेंद्र माने, प्रा. सी. बी. कुदळे, प्रा. कावेरी गरड, प्रा. दिप्ती शिंदे, प्रा रेश्मा भगत रमेश आदलिंगे आदि उपस्थित होते .
पुढे बोलताना सुधाकर काशीद म्हणाले आजचा उन्नत समाज हे संत आणि समाज सुधारकांच्या परिश्रमाचे फळ आहे . धर्मराज चवरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांमध्ये समाजभान व आकलनाची परिपक्वता वाढवायची असेल तर त्यांनी चिकित्सक बनलं पाहिजे असे प्रतिपादन केले. सुधाकर काशीद यांनी मन मनाचे आजार व भूताचे झपाटणे या विषयावर मार्गदर्शन केले प्रा . समाधान गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर प्रा . संताजी गावकरे यांनी सुत्रसंचलन केले तर प्रा . डॉ. विक्रम पवार यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments