सेवानिवृत्त कामगारांचे एक पै देखील ठेवणार नाही; शेजबाभूळगाव येथे खा. महाडिक यांचे कामगारांना आश्वासन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 9, 2022

सेवानिवृत्त कामगारांचे एक पै देखील ठेवणार नाही; शेजबाभूळगाव येथे खा. महाडिक यांचे कामगारांना आश्वासन

 सेवानिवृत्त कामगारांचे एक पै देखील ठेवणार नाही 


शेजबाभूळगाव येथे खा. महाडिक यांचे कामगारांना आश्वासन


कुरुल (कटूसत्य वृत्त):- कामगार हा कारखान्याचा कणा आहे. या कामगारांच्या जीवावरच स्व. भीमराव दादा महाडिक यांनी 'भीमा'चं बीज रोवलं आणि टाकळीच्या माळराणावर नंदनवन फुललं. यामुळे परिसरातील हजारो कामगारांच्या चुली पेटल्या. आमच्याकडे सत्ता आल्यापासून आम्ही शेकडो कामगारांना कायम केले. पगारी वाढवल्या. मात्र निसर्गाचा प्रकोप, शासनाचे उदासीन धोरण यामुळे कारखान्यांमध्ये अडचणी आल्या. यामध्ये विरोधकांनी आणखीन अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सेवानिवृत्त व चालु कामगारांची देणी थकली. आता कारखान्याची परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. यंदा गळीत हंगाम देखील चांगला होईल. शिवाय राज्यात आणि केंद्रात आपल्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच सर्व कामगारांचा पै न पै चुकविणार असे आश्वासन चेअरमन खा. धनंजय महाडिक यांनी केले.


 भीमा शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचारार्थ शेजबाबुळगाव, वरकुटे, औंढी येथे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती विजयराव डोंगरे, सतीश जगताप, सुरेश शिवपुजे, तानाजी गुंड, छगन पवार, सज्जन पवार, अंबादास भोसले, सरपंच दीपक गवळी, गोरख पवार, दीपक पुजारी, विशाल पवार, पांडुरंग बचूटे, तानाजी सुतकर, तानाजी पाटील, प्रदीप फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधक कामगारांचा फक्त वापर करून घेत आहेत. एकदा निवडणूक प्रक्रिया पार पडली की पुन्हा विचारण्यात देखील नाहीत. सभासदांप्रमाणे कामगारांच्या हिताचा विचार करून ज्याप्रमाणे स्व भीमराव दादा महाडिक यांनी कारखाना उभा केला. त्यांचा वारसदार आहे मी. त्यामुळे भीमराव दादाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कामगारांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा शब्द आहे. त्यामुळे विरोधकांच्या कुटील राजकारणाला बळी न पडता भीमा परिवारासोबत राहावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages