तालुक्यात विविध ठिकाणी एकता दौड उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 31, 2022

तालुक्यात विविध ठिकाणी एकता दौड उत्साहात संपन्न

तालुक्यात विविध ठिकाणी एकता दौड उत्साहात संपन्न


         पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर  हा जयंती  दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या एकता दौडमध्ये  विद्यार्थ्यांसह  विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक  उत्साहात सहभागी झाले होते.

            एकता दौड मध्ये  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, स्वेरी कॉलेज, सिंहगड कॉलेज, कर्मयोगी कॉलेज येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. पंढरपूर शहरसह तालुक्यातील करकंब, गोपाळपूर, तारापूर,अनवली, पूळूज, लक्ष्मी टाकळी, कोर्टी, शेळवे या ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये सहभागी घटकांनी यावेळी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages