दिव्यांगांच्या न्यायिक मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 22, 2022

दिव्यांगांच्या न्यायिक मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार

 दिव्यांगांच्या न्यायिक मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार

मोहोळ (तात्यासाहेब काळे):- मोहोळ शहर व तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. असे दिसून येत आहे. हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दिव्यांगाना न्याय देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मोहोळ तालुका प्रमुख प्रशांतबापू भोसले यांनी केले.

  प्रहार अपंग संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार. करण्यात आला त्या प्रसंगी प्रशांतबापू भोसले बोलत होते.  कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला संकटात टाकले होते. अश्या कठीण परिस्थितीत सुद्धा  आमच्या दिव्यांग बांधवांना प्रशांतबापू  भोसले यांनी मदतीचा हात देऊन  एक प्रकारची जीवन संजीवनी दिली होती. आजही आणि या पुढे ही  आमच्या दिव्यांग बांधवांच्या बाबतीत प्रशांतबापू भोसले हे सदैव सतर्क राहून मोठ्या भावाप्रमाणे  पाठीशी असतात. असे मत प्रहारच्या दिव्यांग विभागाचें तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी मांडले.

 यावेळी  प्रहार तालुका उपाध्यक्ष सोपान वनारे, अंकोली मोहोळ चे समाजसेवक तथा दिव्यांग बांधवांचे दिव्यांग मित्र अप्पू बिराजदार, कोळेगावचे अध्यक्ष ज्ञानदेव वाघमोडे, संतोष माने, मोहोळ शहराध्यक्ष नजीर शेख ,धनाजी चोरमुले, पाटकुलचे अरुण काळे, महेश पुराणिक ,दत्तात्रय भांगे गोपीनाथ पवार ,अण्णा चव्हाण ,राहुल मोरे ,पोपट  कोरे ,लखन ठोंबरे, नेताजी खंदारे ,गणेश शिंदे, सुनील माने, विलास मासाळ, रोहिदास पवार, दिगंबर होनमाने, प्रहार संघटनेचे तालुक्यातील व शहरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages