Hot Posts

6/recent/ticker-posts

CBSE च्या 10th, 12th च्या निकालाबाबत मोठी अपडेट; या तारखेला जाहीर होणार निकाल?

 CBSE च्या 10th, 12th च्या निकालाबाबत मोठी अपडेट; या तारखेला जाहीर होणार निकाल?

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु 'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने (CBSE) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत.

सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. सीबीएसई बोर्डाकडून 10वी आणि 12वीचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 35 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार, CBSE इयत्ता 10वीचे निकाल 4 जुलैच्या आसपास आणि इयत्ता 12वीचे निकाल 10 जुलैच्या आसपास जाहीर करील अशी अपेक्षा आहे; मात्र बोर्डाने अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून CBSE निकालाची तारीख ट्विट किंवा अधिकृत नोटिफिकेशनद्वारे निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी जाहीर करत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या नोटिफिकेशनवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण निकालाच्या तारखेची घोषणा कधीही होऊ शकते.या वेळी परीक्षा नव्या फॉरमॅटमध्ये घेण्यात आल्याने, बोर्डाने अंतिम निकालासाठीचे अंतिम निकष अद्याप जाहीर केलेले नाहीत. टर्म 1 ची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह-बेस्ड फॉरमॅटमध्ये घेण्यात आली होती, तर टर्म 2ची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली होती.

दरम्यान, एक तर टर्मचे मार्क्स किंवा इंटर्नल असेसमेंटचे मार्क्स यापैकी जे मार्क्स अधिक होतील ते गृहीत धरावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, याबाबतचा निर्णय घेण्यास उशीर होत असल्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे. योग्य कारणामुळे विद्यार्थ्यांची दोनपैकी कोणतीही एक टर्म चुकली असली, तरी त्यांचे निकाल जाहीर केले जातील असंही बोर्डाने म्हटलं आहे. त्यानुसार CBSE ला अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण होण्याचे निकष म्हणजेच पासिंग क्रायटेरियादेखील तयार करावे लागतील. पंजाब बोर्डासह इतर बोर्ड्सनी दोन टर्म परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत, त्यांनी प्रत्येक टर्मला 40 टक्के वेटेज आणि प्रॅक्टिकल किंवा इंटर्नल्सला 20 टक्के वेटेज देऊन निकाल जाहीर केला आहे. बोर्डांना निकालांमध्ये एकसमानता ठेवायची असेल तर त्यांच्याकडे समान फॉर्म्युला वापरला जाईल.या वर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी CBSEच्या इयत्ता 10 आणि 12 टर्म 2च्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी सुमारे 21 लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते, तर 14 लाख विद्यार्थ्यांनी 12 वीची परीक्षा दिली होती.


Reactions

Post a Comment

0 Comments