Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्ञानाचा योग्य वापर करून संपत्ती, प्रतिष्ठा व समाधान मिळवणे म्हणजेच करिअर होय...

ज्ञानाचा योग्य वापर करून संपत्ती, प्रतिष्ठा व समाधान मिळवणे म्हणजेच करिअर होय...



डॉक्टर धनंजय गायकवाड  'यशोदीप'चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न...

                  टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-आपणास मिळणाऱ्या ज्ञानाचा योग्य मार्गाने वापर करून संपत्ती प्रतिष्ठा व आत्मिक समाधान मिळवणे म्हणजेच आपले करिअर करणे होय असे प्रतिपादन लातूरच्या मैत्री इन्स्टिट्यूट चे प्रमुख व करिअर मार्गदर्शक डॉक्टर धनंजय गायकवाड यांनी केले आहे. यशोदीप एज्युकेशन व यशोदीप फाउंडेशन च्या वतीने रोटरी क्लब टेंभुर्णी येथे आयोजित केलेल्या' गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन' कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉक्टर धनंजय गायकवाड आपले विचार व्यक्त करत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैया शिंदे होते. टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पो.उपनिरीक्षक काशीद,  राष्ट्रवादी युवक चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप औद्योगिक प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, राष्ट्रवादीचे माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले यशोदीप चे प्रमुख गोरख खटके बेंबळे जिल्हा परिषद सदस्य बंडूनाना ढवळे , शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर अण्णा देशमुख, तांबवे ग्रामपंचायतचे तंटामुक्त अध्यक्ष नागाभाऊ खटके तांबवे माजी सरपंच राजाभाऊ खटके, सोसायटीचे माजी चेअरमन संतोष खटके डॉ,मनोज काळे ,   विलास खटके  शेतकी अधिकारी विजय खटके, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य भाऊ महाडिक, जयवंत पोळ, विनोद पाटील, सिद्धेश्वर महाडिक , श्रीपाद खटके विलास खटके, नागेश बापू खटके, तांबवे विकास सोसायटीचे चेअरमन अशोक खटके, सापटणेचे नाना ढवळे, गणेश खटके, भाऊराव लोहार, उपमुख्य कार्यकारी वैभव शिंदे, धनंजय भोसले आदी मान्यवर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यशोदीपचे प्रमुख गोरख खटके यांनी सर्वांचे स्वागत करून खटके परिवारातर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला.

                   डॉक्टर धनंजय गायकवाड पुढे म्हणाले की जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना द्यावे, 'सायकोमेट्रिक टेस्ट'च्या माध्यमातून सध्या विद्यार्थी पुढील आयुष्यात काय करू शकतो हे निश्चित कळू शकते, ध्येयवेडी मुले इयत्ता दहावी मध्येच आपलं करिअर ठरवतात, माणसाला दुसऱ्याचे 'मन' वाचता आले पाहिजे, व्यावसायिक व राजकारणी व्यक्ती कधीच समाधानी नसतात परंतु राजकारण हे अतिशय अवघड व अभ्यासू शेत्र आहे, गुणवत्तेवर बाजी मारणारे आयुष्यात समाधानी असतात, खुद्द अपमान पचवून ध्येयाप्रती वाटचाल करतात ते जीवनात यशस्वी होतात असे प्रभावी विचार व्यक्त करून डॉक्टर गायकवाड यांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांना करिअर घडवण्यासाठी उदात्त ध्येय समोर ठेवून अखंड प्रयत्न करण्याचा मोलाचा सल्ला दिला. यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे यांचे हस्ते दहावी बारावी विशेष गुण प्राप्त करणाऱ्या टेंभुर्णी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झालेले वैभव शिंदे म्हणाले की अभ्यास करताना डोळसपणे सभोवतालच्या ज्ञानाचा अभ्यास करून समन्वय साधावा तरच यशस्वी होता येते, ग्रामीण भागात टॅलेंट आहे पण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले की जिद्द, कष्ट, चिकाटी व समर्पण करून इतरांपेक्षा वेगळे प्रभावी व सकारात्मक करून दाखवल्यास जीवनात यशस्वी होता येते.

                  या कार्यक्रमास खटकेपरिवार, तांबवे, सापटणे, बेंबळे, इंदापूर, टेंभुर्णी, पिंपळनेर इत्यादी ठिकाणचे नागरिक, एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पालक शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे. सूत्रसंचालन बेंबळे येथील प्रा. संतोष शिंदे यांनी केले तर आभार  राजाभाऊ खटके यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments