अर्धनारी वि.का.से. सोसायटीच्या चेअरमन पदी सिद्धेश्वर पवार तर व्हा.चेअरमन पदी धोंडिबा बेरड

घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- मौजे अर्धनारी ता.मोहोळ येथिल वि.का.से. सोसायटीच्या चेअरमन पदी राजन पाटील गटाचे सिद्धेश्वर पवार यांची व धोंडिबा बेरड यांची व्हा.चेअरमन पदी एकमताने निवड करण्यात आली, यावेळी सिद्धेश्वर पवार यांचा चेअरमन पदासाठी व धोंडिबा बेरड यांचा व्हा.चेअरमन पदासाठी एक एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवड़ी नंतर सत्कार करून पेढे वाटून ,गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला.
ही निवड पार पडण्यासाठी सुभाष पवार,नितीन पवार,पांडुरंग पवार, गणेश पवार, राजकुमार पवार,सचिन जाधव,दादा गुंड,सुनिल पवार, महेश पवार, प्रकाश पाटिल, शिवाजी पवार, लक्ष्मण मंडले,सचिन पाटील, महेश निकम, प्रविण पाटिल,नागेश साळवे,अनेकांनी परिश्रम घेतले यात मुख्य निवडनूक अधिकारी म्हणून ढोने साहेब, वसोसायटीचे सचिव थीटे यानी काम पाहिले.
निवडनूक मागिल महिन्यात अतिशय चुरशीने पार पडली होती यात लोकशक्ति परिवाराचे बाळासाहेब पवार यांची पार्टीतील चार उमेदवार हे 2 ते 3 मताने पडले होते त्यामूळे ते कोर्टात गेले होते परंतु कोर्टाने निवड करन्यास परवानगी दिली हाेती त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामती पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभार, जाधवर, दूधे, येळे यानी बंदोबस्ताचे काम पाहिले.
0 Comments