विमान प्राधिकरणाची ‘NOC’ तपासणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशनच्या अनधिकृत चिमणीच्या बांधकाम परवानगीबाबत महापालिकेने ४७८ (२) ची नोटीस बजावली आहे. या नोटिसीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारखान्याच्या परवानगी प्रस्तावावर ४ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. यावेळी विमान प्राधिकरणाची ‘एनओसी’ तपासली जाणार अहे.सिद्धेश्वर कारखान्याने नव्याने २०१४ मध्ये को-जनरेशनची चिमणी महापालिकेच्या परवानगीविना उभारली. कारखान्याची पूर्वीची चिमणी ही ५२ मीटर उंचीची होती. त्यामुळे २०१२ मध्ये किंगफिशरची प्रवासी विमानसेवा अडथळ्याविना सुरू होती. सोलापुरातून अपेक्षित प्रवासी उपलब्ध न झाल्याने ती सेवा बंद करण्यात आली. दरम्यान, कारखान्याने विनापरवानगीने ९१ मीटर उंचीची को- जनरेशन चिमणी उभारली. याबाबत ना महापालिकेची परवानगी घेतली ना विमान प्राधिकरणाची. उड्डाण योजनेंतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर विमान प्राधिकरणाकडून पाहणी झाली.
0 Comments