तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी लागणारी कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन घेण्याचे आवाहन शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्य यांनी केले प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अर्ज करताना प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या आवश्यक त्या प्रकरणी लागू असणारी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी तयार ठेवावीत.
लागणारी कागदपत्रे
जात / जमात प्रमाणपत्र, जात/जमात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध), उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, अल्पसंख्यांकासाठी प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, दिव्यांगांबाबतचे प्रमाणपत्र, सैन्य दलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्नित बॅंक खाते.
प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांची तपशिलवार माहिती संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पत्र क्रमांक क्रमांक: 10/एडीम/ प्रमाणपत्रे/2022/389 ए दिनांक 23 मे 2022 अन्वये देण्यात आलेली आहे.
0 Comments