पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्यामार्फत अभिनव पध्दतीने साजरा करण्यात आला. न्यायालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.
या कार्यक्रमाला दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. मंगापती राव, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी, जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर.एन. पांढरे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. जहागीरदार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर नरेंद्र जोशी, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आय. भंडारी, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग रजपूत, अॅड मिलींद थोबडे, अॅड. निलेश ठोकडे यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
0 Comments