Hot Posts

6/recent/ticker-posts

आदर्श स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा!

आदर्श स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा!

                 कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील आदर्श पब्लिक स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी योग गीताने संगीत शिक्षक शरद विभूते यांनी योग समूह गीत घेऊन सुरुवात केली.यावेळी क्रीडा शिक्षकांनी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पद्मासन, वक्रासन, शवासन, भुजंगासन इ.योगासने विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

                 यावेळी सहशिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी योग दिनाचे महत्व विशद केले.सयुंक्त राष्ट्र संघाने सन २०१५ पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे.ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे.त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यां समोर योग करून हा उपक्रम त्यांचा नित्यदिनक्रम म्हणून बिंबवण्यात यशस्वी झाल्यास या दिनाचे सार्थक होईल असे प्रतिपादन संस्थेच्या प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे केले. 

                 याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे यांनी मार्गदर्शन केले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका शकीलाबी सय्यद, विभागप्रमुख आयेशा मुलाणी, क्रीडा शिक्षक अहमद मुलाणी, नामदेव खारे, प्रगती कदम व इतर सहशिक्षक या सर्वांनी प्रत्यक्षरीत्या सहभाग घेऊन योगा, प्राणायाम केले.

Reactions

Post a Comment

0 Comments