Hot Posts

6/recent/ticker-posts

शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी योगासने व प्राणायाम आवश्यक - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे

शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी योगासने व प्राणायाम आवश्यक - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे

मानेगाव केंद्रातील शाळांमध्ये जागतिक योगा दिन उत्साहात साजरा

                  माढा (कटूसत्य वृत्त):-  आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात फास्ट फूड आणि केमिकलयुक्त पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश होतो आहे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे त्यामुळे प्रत्येकाला निरोगी व सुदृढ आरोग्य राखण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे ही वस्तुस्थिती आहे तरीही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज सकाळी योगासने व प्राणायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी केले आहे.

                  ते चव्हाणवाडी-केवड ता.माढा येथे 21 जून या जागतिक योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.

                  पुढे बोलताना केंद्रप्रमुख रोहिदास कापसे म्हणाले की,अभ्यास करताना विद्यार्थ्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती टिकून रहावी यासाठी निरोगी शरीर व कणखर मन असावे लागते हे साध्य करण्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार आणि व्यायाम,प्राणायाम, योगासने दररोज किमान अर्धा तास करणे गरजेचे आहे. विविध प्रकारची योगासने केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते शिवाय मन प्रसन्न व आनंदी राहते.फक्त एक दिवस योगा दिन साजरा न करता दररोज कृतियुक्त अंमल प्रत्येकाने करावा असे आवाहन त्यांनी केले.

                  यावेळी ठिकठिकाणच्या शाळेतील क्रिडाशिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखवली.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील हजारों विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायाम केला.

                  विविध ठिकाणच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक आण्णासाहेब पाटील, राजकुमार क्षीरसागर, प्रवीण लटके, तुकाराम कापसे, शिवाजी भोगे,अतुल देशमुख,सुनील मोहिते, सचिन क्षीरसागर, सुनील खोत, सुधीर टोणगे, रावसाहेब मगर, लहू गवळी,सागर राजगुरू, अनिल तावसकर, प्रसन्न दिवाणजी,प्रवीण क्षीरसागर, तनुजा तांबोळी, उज्ज्वला क्षीरसागर, मोनिका ओव्होळ, स्मिता नाझरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments