पालखी सोहळ्या निमित्त दिंडीचे तसेच वृक्ष दिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले
.png)
थेऊर (प्रविण शेंडगे) : थेऊर येथील कै.अण्णासाहेब मगर शिक्षण निधी ट्रस्ट संचलित चिंतामणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात २१जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पालखी सोहळ्यातील दिंडीचे तसेच वृक्ष दिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले.
ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे व टाळांच्या गजरात प्रभातफेरी काढली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ग्रंथ हेच जीवन,करा योग रहा निरोग,या घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी उत्साहात जल्लोषात पार पाडली.
विद्यालयाचे पर्यवेक्षक खरात यांनी जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगितले .त्यानंतर माननीय प्राचार्य नेवाळे यांनी स्वतः योगाचा वेष परिधान करत योग दिनानिमित्त पूरक हालचाली शशांकासन, ताडासन तसेच सूर्यनमस्कार इ.प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. त्यानंतर विद्यालयातील सौ.रोटे यांनी प्राणायाम व ध्यानधारणा घेतली. शिंदे सरांनी हास्ययोग घेतला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक चौधरी यांनी त्यांच्या भाषणात आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगितले.
यावेळी प्राचार्य नेवाळे,पर्यवेक्षक खरात ,ज्येष्ठ लिपिक कोलते, शिंदे यांनी अध्यक्ष चौधरी यांचा चाफ्याचे रोपटे देऊन सन्मान केला.
विविध उपक्रमांनी बहरलेल्या या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. अशा या सुंदर उपक्रमाची क्षणचित्रे पठाण व केदारी यांनी आपल्या कॅमेरात टिपली.
विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.नजन यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच सौ. वाडकर यांनी सर्वांचे कौतुक करत आभार मानले.
0 Comments