कारखाना चालवायला पैसे लागत नाही बँकेत पत लागते- युवराज पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 22, 2022

कारखाना चालवायला पैसे लागत नाही बँकेत पत लागते- युवराज पाटील

कारखाना चालवायला पैसे लागत नाही बँकेत पत लागते- युवराज पाटील

               पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- कै. औदुंबर अण्णा पाटील यांनी रक्ताचे पाणी करून विठ्ठल कारखाना चालू केला. मात्र, सध्या कारखान्याला जी कीड लागली आहे. जोपर्यंत कारखान्यात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत कारखान्याला वैभव प्राप्त होणार नाही, असे प्रतिपादन संचालक युवराज पाटील यांनी सांगितल

               पाटील पुढे म्हणाले की, कारखाना चालवायला खिशात पैसे लागत नाहीत, तर बँकेत पत लागते. माझ्याकडे पैसे जरी नसले तरी कै. औदुंबरअण्णा पाटील व कै. यशवंतभाऊ पाटील यांचे निधन

               होऊन २५ वर्षे झाले तरी जी पूर्वी बँकेत त्यांची जी पत होती, ती पत आजही आमच्या घराण्यांनी कायम ठेवली आहे, असे सांगत खुद्द शरद पवार यांनाच या कारखान्याचा कारभारी बदलायचा असल्याचे सांगितले. यावेळी गणेश पाटील, दीपक पवार, अमरजित पाटील, विलास साळुंखे, नारायण जाधव, दिलीप रणदिवे, सागर यादव, दीपक वाडदेकर, दगडू हाके, हनुमंत पवार, माणिक बाबर, रमाकांत पाटील, माजी संचालक तानाजी चव्हाण, रामदास चव्हाण, छगन चव्हाण, तात्यासाहेब नागटिळक, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages