Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी विद्यार्थी हेच खरे शाळेची व संस्थेची संपत्ती आहे: प्रा. गवळी एस एम

 माजी विद्यार्थी हेच खरे शाळेची व संस्थेची संपत्ती आहे: प्रा. गवळी एस एम


लोणी काळभोर (अनिकेत मुळीक):-गुणवंत विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते, काहींना शालेय साहित्य घेता येत नाही, काहींना दप्तर तर अनेकांकडे वह्या घेण्यासही चणचण असते, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा या उद्देशाने आपली सामाजिक बांधीलकी म्हणुन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोर येथील पृथ्वीराज मेमोरियल हायस्कूल व कन्या प्रशाला येथे १९९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थी संघाकडून हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्यांचे वाटप करण्यात आले.
             करोना मुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले, भांडवलाची कमतरता निर्माण झाली, घरचा खर्च भागवताना तारांबळ होऊ लागली, यातच दोन वर्षांनी शाळा सुरू होत आहे. जरी सरकार पुस्तके देत असले तरीही वह्यांचा खर्च खूप होत असतो. हेच जाणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना अभ्यासासाठी मदत व्हावी या हेतूने पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कन्या प्रशाला येथील १९९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थी संघाने एकत्र येऊन आठशे फुलस्केप वह्या खरेदी केल्या.
      योग दिनाच्या औचित्याने कन्या प्रशाला येथे मुख्याध्यापीका सौ झिंजूरके एन एम यांच्या उपस्थितीत ११० मुलींना ४४० वह्यांचे वाटप करण्यात आले.
      दि. २२ ला पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे संस्थेचे अर्थ सचिव व प्राचार्य गवळी एस एम सर यांच्या अध्यक्षतेखाली ६५ विद्यार्थ्यांना ३६० वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरांनी माजी विद्यार्थी हेच खरे शाळेची व संस्थेची संपत्ती आहेत असे मत व्यक्त केले. शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा खरोखर गौरवास्पद असा उपक्रम आहे.झिंजूरके मॅडम यांनी मुलींना आपल्या माहेरी येण्यास कोणाच्याही परवानगीची गरज नसते असे म्हणत माजी विद्यार्थिनींचे स्वागत केले. आजच्या कार्यक्रमातुन शालेय साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाख मोलाचा आहे  . या हुशार विद्यार्थ्यांनी नवीन वहीमध्ये सुंदर हस्ताक्षर काढून व दिलेला अभ्यास पूर्ण करून मदत सत्कार्यी लावण्याचे आश्वासन दिले. सौ एस एस बोरकर मॅडम यांनी या समाजशील उपक्रमाबद्दल माजी विद्यार्थिनींचे आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments