सोलापूर प्रेस फोटो जर्नलिस्ट आणि व्हिडीओ जर्नलिस्ट च्या अध्यक्षपदी एबीपी माझा चे आयुब कागदी यांची एकमताने निवड करण्यात आली

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर प्रेस फोटो जर्नलिस्ट आणि व्हिडीओ जर्नलिस्ट यांची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली, यामध्ये सन2022-23 च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, यावेळी अध्यक्षपदी एबीपी माझा चे व्हिडीओ जर्नलिस्ट आयुब कागदी यांची निवड करण्यात आली, अध्यक्षपदासाठी आयुब कागदी यांच्यासह फोटोग्राफर आप्पा बनसोडे हे देखील इच्छूक होते परंतु चर्चा विनिमय झाल्यानंतर आयुब कागदी यांचे नाव सर्वानुमते अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले, सदर ची बैठक ज्येष्ठ फोटो जर्नलिस्ट केवल तिवारी आणि यशवंत सादुल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली, यावेळी केवल तिवारी यांनी सर्वाना मार्गदर्शन केले,यासह पुढील पदाधिकारी खालीलप्रमाणे उपाध्यक्ष पदी इन न्यूज मनोज हूलसुरे व वृत्तवेध रजनीकांत उपलंची, खजिनदार दत्तराज कांबळे, सहखजिनदार बी आर न्यूज आदित्य केंगार, सरचिटणीस पुढारी आप्पा बनसोडे, समनव्यक पदी अस्मिता व्हिजन विशाल भांगे, सदस्यपदी संदीप वाडेकर, दिनेश शिंदे, वसीम अतार, इराना जुजगार, इरफान शेख यांची निवड करण्यात आली, तर सल्लागार केवल तिवारी, यशवंत सादुल, कृष्णकांत चव्हाण, मिलिंद राऊळ यांची निवड करण्यात आली
0 Comments