पर्सनल करिअर ॲकॅडमीचे तीन विद्यार्थी सैन्य दलात भरती

यंदाही सैन्यभरतीची परंपरा कायम
सिन्नर (कटुसत्य वृत्त) : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या सिन्नर येथील पर्सनल करिअर अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी यंदाही यशाचा आलेख कायम ठेवला. कोनाबे येथील श्री साई नारायण ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी व बारावी शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना लष्करी सैनिकी शिक्षण मोफत दिले जाते. प्रतीवर्षीप्रमाणे याहीवर्षी कॉलेजचा बारावी निकाल शंभर टक्के लागला व बारावीत शिक्षण घेत असताना तीन विद्यार्थी लष्करी सैन्यात भरती झाले. पल्लवी काहांडोळे (74 .33,% प्रथम क्रमांक), एकता शिंदे (66.83% द्वितीय क्रमांक), निखिल हाडवळे (63.83% तृतीय क्रमांक). पहिल्या दोन क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली व भूगोल विषयात तीन विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळाले. पर्सनल करिअर अकॅडमीचे संचालक पवार साहेब अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षणाचे मार्गदर्शन करतात. इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षक प्राचार्या श्रीमती. माळोदे मॅडम ,संचालिका श्रीमती अपर्णा पवार मॅडम, विषय शिक्षिका श्रीमती बैरागी मॅडम, पवार मॅडम वारुंगसे मॅडम , संस्थापक श्री पवार सर (पी.आय) व व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर सर यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments