Hot Posts

6/recent/ticker-posts

एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये एस.पी.स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये एस.पी.स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

                  सोलापूर (कटुसत्य वृत्त): पायल फाउंडेशन, नांदोरे संचलित एस.पी. स्कूलचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. प्रशालेतील एकूण 33 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 30 विद्यार्थ्यांनी 80% च्या वर गुण मिळवून संपादन केले .यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच प्रशालेच्या वतीने घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सूरज अलगुडे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख शहाजी साठे,पालक प्रतिनिधी नंदकुमार काटकर, तात्यासाो भोसले यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

                  यामध्ये पार्थ संतोष वलगे याने 93.40 टक्के गुण मिळवून पेहे केंद्रामध्ये तिसरा व प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच श्रेया विकास उलभगत व प्रतिक्षा दगडू वाघ यांनी  91 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर पृथ्वीराज नंदकुमार काटकर याने 90.20 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .या यशाबद्द्ल प्रशालेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

                  यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे यांनी सांगितले की एस.पी. स्कूलने पहिल्यापासूनच गुणवत्तेसाठी जास्तीत जास्त प्राधान्य दिले आहे आणि यापुढील काळातही ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची पहिल्यापासूनच JEE, NEET व MHT-CET ची तयारी करून घेतली जाणार असून हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडवले जातील.

                  यशस्वी विद्यार्थ्यांना शहाजी साठे, साईनाथ कुंभार, विशाल इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्मक्रमाचे सूत्रसंचालन सूरज अलगुडे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments