Hot Posts

6/recent/ticker-posts

नगराध्यक्ष समीरभाई मुलांणी यांच्या सन्मानार्थ २२५ जणांचे रक्तदान!

नगराध्यक्ष समीरभाई मुलांणी यांच्या सन्मानार्थ २२५ जणांचे रक्तदान!


               कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- कुर्डूवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष समीर भाई मुलांणी यांच्या वाढदिवसा निमित्त यंग बॉईज मित्र मंडळाच्या आयोजित रक्तदान शिबिरात २२५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

               या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जामा मशिदीचे मौलाना अमन सिद्दीकी यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिराचे रक्तसंकलन कुर्डूवाडी ब्लड बँकेकडे करण्यात आले

               यावेळी माजी नगराध्यक्ष शकील तांबोळी,संभाजी सातव,पै.अस्लमभाई काझी,नासीर दाळवाले, रमण शेंडगे मिठूमिया शेख,जमीर मुलाणी,आमिर मुलाणी,प्रदीप सोनटक्के, रवी आठवले,अशपाक तवकल, भैया शेख हुसेन सय्यद अश्फाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

               यासाठी तोफिक शेख शफीक मनेरी साबीर शेख अश्पाक शेख सकलेन तांबोळी इब्राहिम शेख अन्वर शेख रोहित वाघ रोहन वाघमारे फिरोज मनेरी मुज्जू कुरेशी शादाब सय्यद साहिल दाळवाले, आदींसह यंग बॉईज मित्र मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments