Hot Posts

6/recent/ticker-posts

द्वारकामाई वृध्दाश्रमाचे उद्घाटन

द्वारकामाई वृध्दाश्रमाचे उद्घाटन

संस्कृतीचा वैभव मिळाला वारसा हक्क जपला - डॉ.श्रीपालजी सबनीस

              कोंढवे धावडे (कटुसत्य वृत्त):- रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा वैभवची स्वप्नपूर्ती द्वारकामाई या वृद्धाआश्रमचा उदघाटन सोहळा थोर विचारवंत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपालजी सबनीस यांच्या शुभ हस्ते पार पडला.

              यावेळी खऱ्या अर्थाने जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा करू शकलो तर आपण खर जीवन जगलो व वैभवची स्वप्नपूर्ती करताना ज्या आईने एवढ्या वेदना सहन केल्या पण हरवून न जाता त्यांनी वैभवची स्वप्नपूर्ती केली अशी आई जर असेल तर कोणतीच महिला मागे राहणार नाही तसेच त्यांचे ध्येय पूर्ण होवो आशा सदिच्छा व्यक्त करत संस्कृतीचा वैभव तुम्हाला मिळाला असेही ते या वेळी आवर्जून म्हणाले.

              कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने ज्यांनी त्यांना मदत केली अशा सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रति कृतन्यता व्यक्त करत डॉ. श्रीपालजी सबनीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

              या कार्यक्रमाला नगरसेविका सायलीताई वांजळे, सुभाषभाऊ नानेकर, अतुलजी दांगट, अमोलजी कारले,राजेंद्रजी बांदल, संतोषजी शेलार, विजू मामा इंगळे,  डॉ. भाग्यश्री कश्यप,संदीप भाऊ धावडे, शाहरुख शेख, कैलाश साळुंके, गिरीशजी भेळके,कुलदीप सावलेकर, मिताली आवलेकर प्रदीप, कराडकर, हर्षलजी पटवारी, सुभाषभाऊ मोरे, दिपकजी गरुड, शौकत मुल्ला, राहुलजी पडवळ, भरत उरीट उमेशजी कुंभार  व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्तीत होते.

              या कार्यक्रमाचे आयोजन श्री व सौ. वैशाली विनायक वेडपाठक यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत व बाळासाहेब नेहेरकर यांनी केले. संस्थेच्या वतीने विनायक वेदपाठक यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments