राज्यभरात कधी होणार पावसाची एंट्री ? हवामान खात्याने दिला अलर्ट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

राज्यभरात कधी होणार पावसाची एंट्री ? हवामान खात्याने दिला अलर्ट

राज्यभरात कधी होणार पावसाची एंट्री ? हवामान खात्याने दिला अलर्ट

              मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. यापूर्वी हवामान खात्याने ६ जूनच्या दरम्यान राज्यात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत दिले होते.

              तर येत्या ५ दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असून मराठवाड्यात मात्र तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. म्हणूनच येत्या पाच दिवसांसाठी राज्यातील विविध भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून पूर्व बांगलादेशापर्यंत पूर्व -पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातही पूर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

              भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढे पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळणार असून तीन जून वगळता आजपासून सलग ६ तारखेपर्यंत पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

              २ जून – आज दिनांक २ जून रोजी पुणे,सातारा,सांगली,सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी ,रायगड ,बीड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,नाशिक, परभणी, हिंगोली,नांदेड या भागाला यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

              ३ जून – उद्या दिनांक ३ जून रोजी सातारा, सांगली , सोलापूर, कोल्हापूर या भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असून वर्धा ,गोंदिया आणि चंद्रपूर या भागामध्ये मात्र उष्णतेच्या लाटेसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages