महावितरणचा गलथान कारभार बेतला जीवावर, पावसाने उघडीप दिल्यानंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

महावितरणचा गलथान कारभार बेतला जीवावर, पावसाने उघडीप दिल्यानंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष

महावितरणचा गलथान कारभार बेतला जीवावर, पावसाने उघडीप दिल्यानंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष

              बार्शी (कटूसत्य वृत्त):- महावितरणच्या गलथान कारभारामुळे उसाचे फड, कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. यंदाच्या वर्षात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून इथपर्यंत ठीक होते पण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे तर महावितरणच्या कारभरामुळे सर्वसामान्यांना शॉक बसेल अशीच घटना घडली आहे.

              महावितरणचा मनमानी कारभारामुळे तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यास आपला जीव गमवावा लागला आहे. बार्शी शहर व परिसरात दोन दिवसांपूर्वी  पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, झाडेही कोसळली तर विद्युत तारा ही जमिनीवरच पडल्या होत्या. दोन दिवसानंतरही विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारा ह्या शेत शिवारात पडलेल्या होत्या. दरम्यान, शेतावर गेलेल्या सतीश शिवाजीराव गुंड (वय 57) यांचा जामिनीवर पडलेल्या ताराला स्पर्श झाला आणि यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे महावितरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कारण्याची मागणी भाजपाचे राजेंद्र मिरगणे यांनी केली आहे.

              बार्शी शहरासह तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत तर झाले होतेच पण अनेकांच्या घरात ही पाणी शिरले होते. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्या होत्या. असाच प्रकार शहराला लागूनच असलेल्या कासारवाडी शिवारात घडली. शेतामध्ये जमिनीवर पडलेल्या विद्युत तारामध्ये विद्युत प्रवाह सुरुच होता. अशातच सतीश गुंड यांचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यूही झाल्याची घटना घडली आहे. मात्र, दोन दिवसाच्या आवधीमध्ये दुरुस्ती कामे अन्यथा त्या भागातील विद्युत पुरवठा तरी खंडीत करणे गरजेचे होते.

              वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबावरील तारा जमिनीवर तुटून पडल्या आहेत. दरम्यानच्या दोन दिवसांमध्ये ही दुरुस्तीची कामे होणे अपेक्षित होते शिवाय दुरुस्ती झाली नाही तर किमान त्या भागातील विद्युत पुरवठा खंडीत करणे गरजेचे होते. महावितरणमधील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages