ज्येष्ठ विधीतज्ञ अँड. मिलिंद थोबडे यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलवर सलग तिसऱ्यांदा निवड
मंगळवेढा वकील संघाकडून अभिनंदन
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत ज्येष्ठ विधीतज्ञ अँड. मिलिंद थोबडे यांनी सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय संपादन करून उल्लेखनीय हॅट्रिक साधली आहे. त्यांच्या या यशाबद्दल राज्यभरातील वकील बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध बार संघटना, विधिज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अँड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या प्रदीर्घ विधीसेवेत कायदेविषयक सखोल अभ्यास, व्यावसायिक प्रामाणिकता, वकील बांधवांच्या प्रश्नांबाबतची बांधिलकी आणि प्रभावी नेतृत्व यामुळे विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सलग तिसऱ्या विजयाने अधिवक्ता समाजाने त्यांच्या कार्यावर पुन्हा एकदा दृढ विश्वास व्यक्त केल्याचे मानले जात आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मंगळवेढा वकील संघाचे अध्यक्ष अँड. राजू शेख म्हणाले,
"अँड. मिलिंद थोबडे यांची सलग तिसऱ्यांदा झालेली निवड ही त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि वकील समाजातील व्यापक स्वीकारार्हतेची पावती आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील अधिवक्त्यांना पुढील काळात अधिक प्रभावीपणे मिळेल, असा विश्वास आहे."
मंगळवेढा वकील संघाचे सदस्य अँड. डी. सी. जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,
"वकील समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे आणि अधिवक्त्यांच्या हितासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून अँड. मिलिंद थोबडे यांची ओळख आहे. त्यांचा विजय हा वकील समाजाच्या विश्वासाचा विजय असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा."
मंगळवेढा वकील संघाचे सदस्य, तथा मधुसुधन उपभोक्ता व राष्ट्रीय मानव अधिकार हक्क महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष (वकील सेल) म्हणून कार्यरत असलेले अँड. अश्वनीत (नाना) चेळेकर यांनी सांगितले,
"अँड. मिलिंद थोबडे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अभ्यासू विधीतज्ञांचे कार्य आम्हा तरुण अधिवक्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सलग तिसऱ्यांदा झालेल्या निवडीमुळे गुणवत्ता, निष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्य यांना अधिवक्ता समाजाने दिलेली मान्यता अधोरेखित झाली आहे. न्यायव्यवस्था आणि अधिवक्ता हितसंरक्षणासाठी त्यांचे योगदान पुढील काळातही महत्त्वपूर्ण राहील."
यावेळी अँड. अश्वनीत (नाना) चेळेकर यांनी अँड. थोबडे यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करताना न्याय, संविधानिक मूल्ये आणि अधिवक्त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांचे नेतृत्व अधिक बळकट होईल, तसेच सामाजिक माध्यमांवर विविध स्तरांतून अँड. मिलिंद थोबडे यांच्या विजयाचे स्वागत करण्यात येत असून वकील समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




No comments:
Post a Comment