Ads

Ads Area

फडणवीसांची पहिली खेळी पूर्ण, भाजप आमदारांची मोहिम 'फत्ते'

 फडणवीसांची पहिली खेळी पूर्ण, भाजप आमदारांची मोहिम 'फत्ते'




मुंबई (कटूसत्य वृत्त):- विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एक एक करून आमदार मतदान करत आहे. आता जवळपास भाजपच्या सर्व आमदारांनी मतदान पूर्ण केलं आहे.फक्त सुधीर मुनगंटीवार यांचं मतदान बाकी आहे. ते दुपारी मतदान करणार आहे. तर पिंपरी चिंचवडचे आमदारही दुपारून मतदान करणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी मतदान सुरू आहे.

भाजपने पहिली मतदान करत आपल्या 104 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या सत्रातच भाजपच्या आमदारांना मतदान करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर भाजप आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत भाजपाच्या १०४ आमदारांनी मतदान केलं आहे.

सुधीर मुंनगंटीवार यांचं मतदान बाकी आहे, ते दुपारपर्यंत मतदान करणार आहे. तर पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप देखील मतदानासाठी निघाले आहेत ते दुपारून मतदान करणार आहे. एकूण 106 आमदारांचे मतदान दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. आता अपक्ष आमदारांचे मतदान बाकी आहे.

भाजप आमदार रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना तर दुसरीकडे, चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळाकडे निघाले आहे. लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक आहे. पण, अशा परिस्थितीतही त्यांनी राज्यसभेला मतदानाचा हक्क बजावला होता.

आता विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी एका खासगी कार्डियाक रुग्णवाहिकेनं मुंबईकडे रवाना झाले आहे. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचा पथक हे लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असणार आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close