पंढरीच्या वारीची जागतिक स्तरावर नोंद घेतली जावी, यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत : संभाजीराजे छत्रपती
.png)
पुणे (कटूसत्य वृत्त):- संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचे आळंदीतूनप्रस्थान पुण्याच्या दिशेने झाले आहे. यावेळी विश्रांतवाडी चौकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाले होते.यावेळी जोरदार पावसाला सुरवात झाली, अशा भर पावसामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत फुगडीचा फेर छत्रपती संभाजी महाराजांनी धरला. छत्रपती संभाजी महाराज यांनी वारीमध्ये सहभाग घेतला होता. विश्रांतवाडीच्या चौकांमध्ये पालखीचे आगमन झाले तशी जोरदार पावसाने हजेरी लावली.
अशा पावसामध्ये छत्रपती संभाजी महाराज चिंब भिजले होते. तरीदेखील त्यांचा उत्साह काही कमी झाला नाही, त्यांनी पावसामध्ये कार्यकर्त्यांनी दिलेली छत्री नाकारली आणि भर पावसात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथे तुकोबांची पालखी असो किंवा ज्ञानेश्वरांची पालखी असो त्यांना वंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस येतो. त्यातलाच मी एक आहे. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी यांनी देखील पालखीला संरक्षण दिले होते आणि या वर्षापासून आमच्याकडून तुकाराम महाराजांच्या पालखीचे देखील जरीपताका देण्यात आलेला आहे."
0 Comments