विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १५ अर्ज ; सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव गर्जे रिंगणात

मुंबई (नासिकेत पानसरे): विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १० जागांसाठी तब्बल १५ दाखल करण्यात आले आहेत.रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याने भाजपने सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याचे स्पष्ट जाले आहे.राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी तिसरा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.येत्या १३ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.दोन अपक्षांनी अर्ज दाख ल केले असले तरी त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक आमदारांच्या स्वाक्ष-या नसल्याने छाननीत त्यांचे अर्ज बाद होवू शकतात.
येत्या २० जून रोजी विधानपरिषेदच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्जे,भाजपकडून उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांनी तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय या भाजपच्या तर सचिन अहिर आणि आमशा पाडवी या शिवसेनेच्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी त्यांच्या अर्जावर सूचक आमदारांच्या स्वाक्ष-या नसल्याचे समजते. त्यामुळे उद्या होणा-या छाननीत त्यांचे अर्ज बाद होवू शकतात.त्यामुळे विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १३ अर्ज कायम राहू शकतात.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या १३ जून पर्यंत असल्याने त्याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विजयी होवू शकतात मात्र त्यांनी प्रसाद लाड यांना पाचवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले असतानाच आज सदाभाऊ खोत यांनी अर्ज दाखल केल्याने आता भाजपचे सहा उमेदवार झाले आहेत.राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने चुरस निर्माण झाली असतानाच विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान गुप्त मतदान पद्धत असल्याने भाजपच्या अतिरिक्त उमेदवारांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३,काँग्रेसचे ४४,शिवसेनेचे ५४,भाजपचे 113 संख्याबळ आहे.छोट्या पक्षांचे १६ तर १३ अपक्ष आमदार आहेत.
No comments:
Post a Comment