Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंदेवाडीत गुणवंतांचा सन्मान

 शिंदेवाडीत गुणवंतांचा सन्मान 



माढा  (कटूसत्य वृत्त):- राहुल सार्वजनिक वाचनालय व ग्रामपंचायत शिंदेवाडी ता. माढा यांच्या संयुक्त विद्यमाने  दहावी बोर्ड परीक्षेतील  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लतिका शिंदे या होत्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना शहराध्यक्ष शंभू साठे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक राहुल सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष ग्रंथमित्र कांतीलाल साळुंके यांनी केले.
यावेळी काजल शिंदे,अपेक्षा शिंदे,योगिता शिंदे,प्रांजली शिंदे,रोहिनी शिंदे,दिदी शिंदे,स्वामिनी मुळे,विक्रम सावंत, विवेक पवार या  विद्यार्थ्यांचा  सन्मान पत्र  व शालेय साहित्य देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी उपसरपंच संजय सावंत,संदीप शिंदे,ग्रामसेवक सुनील गायकवाड,रामभाऊ शिंदे,किसन सावंत,दशरथ सावंत,रवळीनाथ शिंदे,सतिश शिंदे,अमोल देवकुळे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सुनिता शिंदे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments