इंजि. मनोजकुमार गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य सहसंघटक तथा पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ अध्यक्ष पदी नियुक्ती


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेड तर्फे इंजि. मनोजकुमार गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य सहसंघटक तथा पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ अध्यक्ष पदी नियुक्ती. करण्यात आली असल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांनी केली आहे.
इंजि. मनोजकुमार गायकवाड, हे स्वतः उच्चशिक्षित असून ते सातत्य पूर्ण रित्या शैक्षणिक, पदवीधर, औद्योगिक, सामाजिक अडचणी वरती सोडविण्यासाठी कार्यरत असतात. त्यांनी पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन करणे, सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन बचाव, कोव्हीड काळात जनसामान्यांच्या अडचणी, विनाअनुदानित शिक्षक अडचणी सोडविण्यासाठी राज्यव्यापी जनआंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.
ते मूळचे सोलापूर जिल्ह्य़ातील रहिवासी असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने ते देश विदेशात कार्यरत असून, जागरूक सामाजिक चळवळी मुळे पाश्चिम महाराष्ट्रात उत्तम जनसंपर्क सह आपल्या वेगळ्या कार्यपद्धती बद्दल ओळखले जातात.
सर्व बाबी पाहता संभाजी ब्रिगेड पार्टीची विचारधारा वाढविण्याच्या दृष्टीने व राजकीय बांधणीच्या अनुषंगाने ते प्रदेश कार्यकारिणीच्या धोरणा प्रमाणे नवनियुक्त जबाबदारीस न्याय देऊ शकतील हा विश्वास व्यक्त करुन राज्य कार्यकारिणी त्यांची सदर पदावर नियुक्ती केली आहे.पाश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी तथा सर्व कार्यकर्ते यांनी त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन सदर निवडीचे स्वागत केले आहे.निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे, प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री अभिमन्यू पवार यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी पि.ची. शहराध्यक्ष शिवश्री प्रविण कदम, शिरुर लोकसभा अध्यक्ष अॅड. सुनील वाडेकर पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0 Comments