शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमित योग करावे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी यांचे आवाहन
करा योग रहा निरोगीच्या जुळे सोलापूर परिसरात घोषणाआंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रॅली


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमित योग करावे, योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते, असे प्रतिपादन पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी यांनी आज येथे केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिविंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्याण योग, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागरण रॅलीच्या उदघाटनप्रसंगी डॉ. स्वामी बोलत होते.
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा युवा समन्वयक अधिकारी अजितकुमार, योग समन्वयक मनमोहन भुतडा, पंतजली योग पीठाच्या सुधा अळळीमोरे, माजी नगरसेविका संगिता जाधव, सुभाष उपासे, राजु जुंजा, सुहास देशपांडे, दत्तात्रय चिवडशेट्टी, सुनील आळंद, रमेश सोनी, नंदकुमार चितापुरे, लक्ष्मण भंडारी, जितेंद्र महामुनी, रघुनंदन भुतडा आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
के.एल.ई. हायस्कूलच्या मैदानावर सकाळी सातपासून लोकांनी रॅलीसाठी गर्दी केली होती. ‘करा योग रहा निरोग’ मानवतेच्या कल्याणासाठी योग आदी घोषणासह आज जुळे सोलापूर परिसर दुमदुमला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाचशे लोकांची जनजागरण रॅली के.एल.ई. हायस्कूल मैदान, दावत चौक, भारतीय विद्यापीठ, शिवदारे कॉलेज आणि म्हाडा कॉलनीमार्गे डी मार्टपासून के.एल.ई. हायस्कूल मैदानावर विर्सजीत करण्यात आली. यावेळी सर्व योग संस्थाच्या प्रतिनिधी यांनी योगविषयक संदेश देणारे फलक, झेंडे आपल्या हातामध्ये घेतले होते.
मंगळवारी (दि. 21 जून) आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याकरिता सकाळी सात ते आठ यावेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मानवतेसाठी योग विषयावर योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सर्व वयोगटांसाठी खुले आहे. यामध्ये मोठया संख्येने लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केली.
0 Comments