Hot Posts

6/recent/ticker-posts

लायन्स क्लब ऑफ सांगोला व पदाधिकारी विविध पुरस्कारांनी सन्मानीत

 लायन्स क्लब ऑफ सांगोला व पदाधिकारी विविध पुरस्कारांनी सन्मानीत


विक्रमी रक्तदान , पर्यावरण, उत्कृष्ट अध्यक्ष, उत्कृष्ट सचिव पुरस्कार प्रदान

सांगोला (कटूसत्य वृत्त):- द इंटरनॅशनल असोसिएशन लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ ड१ विभाग १ उपविभाग ४ झोन सोशल 'सुंगध' कार्यक्रम प्रमुख अतिथी माजी प्रांतपाल,झोन ४ व लायन्स क्लब सांगोला मार्गदर्शक प्रा.ला.प्रबुद्धचंद्र झपके, प्रांतपाल (नियुक्त) ला.राजशेखर कापसे, द्वितीय उपप्रांतपाल (नियुक्त) ॲड एम.के.पाटील,माजी प्रांतपाल ला., डॉ.गुलाबचद शहा, डॉ.व्यंकटेश यजुर्वेदी,ला.अरविंद कोणशिरसगी विभाग १ सभापती ला.अझमजी शेख, सचिव ला.चंद्रकांत रच्चा उपविभाग ४ सभापती व आयोजक ला.ख्याजाभाई शेख , सचिव ला.अब्दुलगनी पठाण  यांचे उपस्थितीत व सुप्रसिद्ध गझलकार मा. अतुलजी बेले यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गझल कार्यक्रमाने सोलापूर येथील आय.एम.ऐ. हॉलमध्ये दि.१८ जून २०२२ रोजी संपन्न झाला.
     मार्गदर्शक ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी एक हजार पेक्षा जास्त रक्तदाते रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे अनमोल कार्य करतात.यावर्षी ११११ रक्तदात्यानी रक्तदान करून रेकॉर्ड केले.यासाठी सांगोला लायन्स क्लबचा रेकॉर्डेड ब्लड डोनेशन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्ष सन २०२१-२२ निमित्त विद्यामंदिर परिवार एक सदस्य एक झाड यासाठी पर्यावरण पुरस्कार व  लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष  प्रा.ला.धनाजी चव्हाण यांना उत्कृष्ट अध्यक्ष व सचिव उन्मेश आटपाडीकर यांना उत्कृष्ट सचिव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रांत ३२३४ ड १  सन २०२१-२२ पदाधिकारी व नियुक्त पदाधिकारी, पंढरपूर, सोलापूर क्लासिक सदस्य यांचेसह  लायन्स क्लब ऑफ सांगोला कॅबिनेट ऑफिसर ला.नरेद्र होनराव, सदस्य ला.मंगेश म्हमाणे,ला.अमोल महिमकर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments