Hot Posts

6/recent/ticker-posts

महावितरणने नुकसान टाळण्यासाठी वीज मीटरचा पुरवठा करावा

 महावितरणने नुकसान टाळण्यासाठी वीज मीटरचा पुरवठा करावा

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यभरात वीज वितरण करणाऱया महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी मीटरसाठी पैसे भरले आहेत ते ग्राहक जोपर्यंत मीटर उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मीटरशिवाय वीज वापरणार अशी भूमिका घेत आहेत.

त्यामुळे महावितरणच्या महसुलाचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकासन होत आहे. ते टाळण्यासाठी महावितरणने तत्काळ पुरेसे मीटर विभागीय कार्यालयांना उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने स्पष्ट केले आहे. देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अशी महावितरणची ओळख असली तरी गेल्या वर्षभरापासून पैसे भरलेल्या ग्राहकांनाही मीटरचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱयांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments