Ads

Ads Area

ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा

 ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा



बेंबळे (कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी तालुका माढा येथे आज दिनांक 21 जून २२ रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय  टेंभुर्णी शाखेचे वतीने कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करून, शाखेच्या च्या संचालिका ब्रह्माकुमारी अनिता बहेनजी यांनी शारीरिक तंदुरुस्ती बरोबर मनाची तंदुरुस्ती किती आवश्यक आहे यासाठी भारतीय प्राचीन राजयोगाविषयी सविस्तर माहिती दिली. सकाळी उठल्याबरोबर परमात्म्याच्या आठवणीत  सकारात्मक विचारांचे चिंतन करीत असताना मनाला शुद्ध  संकल्प, शुभ भावना यांचे खुराक देऊन सकारात्मक विचारांने  मनोबल वाढवणे कसे शक्य आहे हे सविस्तर विषद केले.यावेळी मनाचा एक्सरसाइज म्हणजे  मेडिटेशन सर्व उपस्थितांकडून करून घेतले.सदर राजयोग तथा मेडिटेशन चे क्लास टेंभुर्णी येथे ब्रह्मा कुमारी यांचे शाखेत दररोज नियमित विनामूल्य घेतले जातात तरी इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अनिता बहेनजी यांनी केले.
  यानंतर पतंजलि अष्टांग योगा विषयीची माहिती टेंभुर्णी येथील योगा अभ्यासक लोंढे सर यांनी देऊन योगासने विधीवत कशी करावीत याची महत्वपूर्ण माहिती सांगितली.
   या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन टेंभुर्णी येथील हॅपी मॉर्निंग ग्रुपच्या टीमने सुंदर अशा पोषाखा मध्ये सहभाग नोंदविला . त्यांनी उपस्थितासमोर सर्व प्रकारचे व्यायाम तसेच योगानृत्य अतिशय सुंदर व तालबद्ध पद्धतीने सादर करून सर्वांना आकर्षित केलेमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले.यामध्ये ग्रुपचे प्रमुख गोरे भाऊ यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास टेंभुर्णी परिसरातील ब्रम्हाकुमारी परिवार, ओमशांती सेंटरच्या सहयोगी सायली बहेन,पूजाबहेन, हॅपी मॉर्निंग ग्रुपमध्ये सामील असलेले प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, अधिकारी, डॉक्टर,सेवाभावी,नोटरीयन तसेच तेंभूर्णी बेंबळे भिमानगर शिराळ इत्यादी ठिकाणचे अनेक नागरिक या याप्रसंगी उपस्थित होते शेवटी सर्व उपस्थितांचे आभार डॉक्टर औदुंबर पावले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close