ऊस उत्पादकांच्या पाठबळावर यंदाही लोकनेते गाळपात बाजी मारणार चेअरमन बाळराजे पाटील यांचा विश्वास - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 29, 2022

ऊस उत्पादकांच्या पाठबळावर यंदाही लोकनेते गाळपात बाजी मारणार चेअरमन बाळराजे पाटील यांचा विश्वास

 ऊस उत्पादकांच्या पाठबळावर यंदाही लोकनेते गाळपात बाजी मारणार चेअरमन बाळराजे पाटील यांचा विश्वास


कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न

अनगर(कटूसत्य वृत्त):-आपल्या लोकनेते कारखान्यास दरवर्षी विक्रमी टन ऊस गणितासाठी देणारे सुजाण ऊस उत्पादक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठबळावर लोकनेते कारखान्याने गत वर्षीच्या गळीत हंगाम विक्रमी गाळप यशस्वी केला आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदाही मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता असुन नोंद दिलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणला जाणार असल्याची ग्वाही लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी दिली.

यावेळी बोलताना बाळराजे पाटील म्हणाले की, मोहोळसह पंढरपूर, बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत कारखान्याचे कामकाज सुरू असुन इतर साखर कारखान्याच्या तुलनेत कारखाना ऊस उत्पादक शेतकर्यांना सर्व सोयी देत असुन कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पाठबळावर आपण प्रत्येक हंगामात शेतकरी सभादांचा ऊस वेळेत गाळप करीत आहोत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता असुन नोंद दिलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी आणला जाणार असल्याचेही लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितले.

मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा सन २०२२-२०२३ गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे कर्मचारी सी.एन देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, लक्ष्मण मुखेकर, मुख्य शेती अधिकारी एम.आय.देशमुख, के.डी.वैद्य, संजय खुडे, संजय कासार, मदने, राजशेखर गायकवाड, नेताजी बोडके, सोमनाथ म्हेत्रे, अनंत उरणे, अनिल पवार, हनुमंत पासले, अजित बोडके आदी उपस्थित होते. 

गाळप हंगाम २०२२-२३ साठी कारखान्याच्या शेती विभागामार्फत नुकतेच ऊस तोडणी वाहनांचे वाहतूक करारास सुरवात करण्यात आली. त्यासाठी कारखान्याचा सन २०२२-२०२३ गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन, तसेच इतरही विविध तांत्रिक बाबींची पडताळणी बाळराजे पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर केली. यावेळी त्यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला. संस्थापक अध्यक्ष राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामही विक्रमी गाळपाने यशस्वी करण्याचा मनोदय व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages