पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

मुंबई, (कटुसत्य वृत्त):- वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून 'माझी वसुंधरा अभियान 2.0' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान रविवार 5 जून 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
मुंबईतील टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे.
0 Comments