जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून शेतकऱ्यांना पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा दिलासा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या न्यायालयात उत्तम पाटील रा..गुंजेगाव ता. मंगळवेढा यांनी न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या विरूध्द शेडनेटच्या नुकसान भरपाईचा विमा नाकारल्याबद्दल तक्रार दाखल केली होती.सदरच्या तक्रारीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लागला असून तक्रार हा शेतकरी असून त्याला न्याय मिळाला नुकसान भरपाई म्हणून ५,५०,००० व शारिरिक व मानसिक त्रासापोटी ५,००० रुपये तक्रारीच्या खर्चापोटी ३,००० रुपये मिळाले.याची हकिकत अशी तक्रारदार हा शेतकरी असून त्यांनी ढोबळी मिरचीसाठी शेडनेट उभा केले होते. व त्यासाठी तक्रारदार यांनी न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून या शेडनेटचा विमा उतरवला होता.मंगळवेढा तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना पाऊस वादळ वाऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसला व त्यामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात शेडनेटचे नुकसान झाले.त्याची माहिती त्यांनी इन्शुरन्स कंपनीला दिली व त्यांनी सर्वे करून तक्रारदार यांच्याकडून योग्य ती कागदपत्राची पुर्तता करण्यास सांगितले. त्यातील महत्वाचे कागदपत्रे म्हणजे हवामान अहवाल सादर करण्यास सांगितले. परंतू हवामान खाते मुंबई यांनी हवामान अहवाल बरेच दिवस दिला नाही. नंतर मिळाला तेव्हा उशीर झाला असे विरूध्द पक्ष यांनी सांगितले.इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा केवळ त्यांनी हवामान अहवाल उशीरा सादर केल्याने त्यांचा विमा दावा नाकारला. तक्रारदाराकडून अॅड. माधुरी शैलेश मोरडे (जगताप) यांनी काम पाहिले. व त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडून केवळ हवामान अहवाल उशिरा दिल्याने कोणी नुकसान भरपाई मागू शकत नाही हे न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही असे मत मांडून शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळवून दिला.
No comments:
Post a Comment