Hot Posts

6/recent/ticker-posts

मध्य रेल्वे आषाढीनिमित्त विशेष गाड्या चालवणार; भाविकांना सुविधा

 मध्य रेल्वे आषाढीनिमित्त विशेष गाड्या चालवणार; भाविकांना सुविधा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वे लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर दरम्यान आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. मिरज-कुर्डूवाडी, पंढरपूर-मिरज, सोलापूर-पंढरपूर, नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर अशा या गाड्या 05 जुलै ते 14 जुलैदरम्यान चालवण्यात येणार आहेत.

सोलापूर-पंढरपूर अनारक्षित विशेष (20 सेवा)

गाडी क्रमांक 01113 DEMU विशेष सोलापूरहून 10.10 वाजता 5 जुलै ते 14 जुलै (10 सेवा) सुटेल आणि पंढरपूरला त्याच दिवशी 13.00 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01114 DEMU स्पेशल पंढरपूरहून 5 जुलै ते 14 जुलै रोजी 15.40 वाजता सुटेल (10 सेवा) आणि सोलापूरला त्याच दिवशी 18.50 वाजता पोहोचेल. या गाडीला बाळे, पाकणी, मुंढेवाडी, मोहोळ, मलिकपेठ, अंगार, वाकाव, माढा, कुर्डुवाडी आणि मोडनिंब असे थांबे असतील. या गाडीला 10 DEMU कोच असतील.

लातूर-पंढरपूर (12 सेवा)

गाडी क्रमांक 01101 आषाढी विशेष 5 जुलै रोजी लातूरला 07.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.25 वाजता पंढरपूरला पोहोचेल. तसेच ६ जुलै, 8जुलै, 11जुलै,12 जुलै आणि 13 जुलै (6 सेवा) रोजीही ही विशेष गाडीच्या फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 01102 आषाढी विशेष 5 जुलै रोजी पंढरपूर येथून 14.32 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.20 वाजता लातूरला पोहोचेल. ही गाडी ६ जुलै, 8 जुलै, 11 जुलै, 12 जुलै आणि 13 जुलै (6 सेवा) रोजीही चालवण्यात येणार आहे. या गाडीला हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, धाराशिव, पांगरी, बारसी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडनिंब येथे थांबे असतील. त्यात 8 स्लीपर क्लास, 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणीच्या बोगी असतील.

मिरज-पंढरपूर अनारक्षित विशेष (20 सेवा)

गाडी क्रमांक 01107 अनारक्षित विशेष गाडी 5 जुलै ते 14 जुलै (10 सेवा) दरम्यान मिरजहून 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 08.25 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01108 अनारक्षित विशेष पंढरपूर 5 जुलै ते 14 जुलै (10 सेवा) दरम्यान 09.50 वाजता पंढरपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी 13.50 वाजता मिरजला पोहोचेल. या गाडीला आरग, बेळंकी, सुलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळा, वासूद आणि सांगोला येथे थांबे असतील. या गाडीत 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 14 सामान्य द्वितीय श्रेणी बोगी असतील.

मिरज -कुर्डूवाडी पूर्णपणे अनारक्षित विशेष (20 सेवा)

गाडी क्रमांक 01109 अनारक्षित स्पेशल मिरजहून 5 जुलै ते 14 जुलै (10 सेवा) दरम्यान 15.10 वाजता मिरजहून सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता कुर्डुवाडीला पोहोचेल. गाडी क्रमांक 01110 अनारक्षित स्पेशल कुर्डुवाडी येथून 5 जुलै ते 14 जुलै (10 सेवा) (10 सेवा) दरम्यान 19.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.55 वाजता मिरजला पोहोचेल. या गाडीला आरग, बेळंकी, सलाग्रे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळा, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडनिंब हे थांबे असतली. 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 14 सामान्य द्वितीय श्रेणी बोगी या गाडीला असतील.

पंढरपूर-मिरज विशेष (8 सेवा)

गाडी क्रमांक 01111 विशेष पंढरपूर 4 जुलै रोजी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.15 वाजता मिरजला पोहोचेल. ही गाडी 5 जुलै, 9 जुलै आणि 11 जुलै (4 सेवा)रोजीही चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01112 विशेष 4 जुलै रोजी मिरजहून 16.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.20 वाजता पंढरपूरला पोहोचेल. ही गाडी 5 जुलै, 9 जुलै आणि 11 जुलै (4 सेवा) रोजीही चालवण्यात येणार आहे. या गाडीला सांगोला, वासुद, जावळा, म्हसाबा डोंगरगाव, जठ रोड, धालगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ, सुलगरे, बेळंकी आणि आरग हे थांबे असतील. यात 6 स्लीपर क्लास, 6 सामान्य द्वितीय श्रेणी 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन असेल.

नागपूर-मिरज स्पेशल (4 सेवा)

गाडी क्रमांक 01115 विशेष गाडी 6 जुलै आणि 9 जुलै (2 सेवा) रोजी नागपूरहून 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक 01116 विशेष गाडी मिरजहून 7 जुलै आणि 10 जुलै (2 सेवा) रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरोड धालगाव, कवठेमहांकाळ व सलाग्रे असे थांबे असतील. दोन AC- 3 टियर, 8 स्लीपर क्लास, 8 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन या गाडीला असतील.

नागपूर-पंढरपूर विशेष (4 सेवा)

गाडी क्रमांक 01117 विशेष नागपूर 7 जुलै आणि 10 जुलै (2 सेवा) रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01118 विशेष पंढरपूर 8 जुलै आणि 11 जुलै (2 सेवा) रोजी 17.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डुवाडी असे थांबे असतील. दोन AC- 3 टियर, 8 स्लीपर क्लास, 8 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन या गाडीला असतील.

नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (4 सेवा) 

गाडी क्रमांक 01119 विशेष गाडी 6 जुलै आणि 9 जुलै रोजी 14.40 वाजता नवीन अमरावतीहून सुटेल (2 सेवा) आणि दुसऱ्या दिवशी 09.10 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01120 विशेष पंढरपूर येथून 7 जुलै आणि 10 जुलै (2 सेवा) रोजी 19.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.40 वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डुवाडी असे थांबे असतील. चार AC- 3 टियर, 8 स्लीपर क्लास, 6 सामान्य द्वितीय श्रेणी 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह हा गाडी असेल.

खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा) 

गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव 7 जुलै आणि 10 जुलै (2 सेवा) रोजी 11.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01122 स्पेशल पंढरपूर येथून 8 जुलै आणि 11 जुलै (2 सेवा) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.30 वाजता खामगाव येथे पोहोचेल. या गाडीला जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डुवाडी असे थांबे असतील. चार AC- 3 टियर, 8 स्लीपर क्लास, 6 सामान्य द्वितीय श्रेणी 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ही गाडी असेल.

सर्व आषाढी विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


Reactions

Post a Comment

0 Comments