Hot Posts

6/recent/ticker-posts

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य व सोलापूर सेंटरचा आज पदग्रहण सोहळा

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य व सोलापूर सेंटरचा आज पदग्रहण सोहळा

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य व सोलापूर सेंटर सन २०२२ २३ करीता नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम शुक्रवार दि. २७.०५.२०२२ रोजी सायंकाळी ७.०० वा. हॉटेल बालाजी सरोवर, होटगी रोड, सोलापूर या ठिकाणी सम्पन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे नुतन चेअरमन  दत्तात्रय मुळे व सोलापूर सेंटर चे चेअरमन युवराज चुंबळकर, सेक्रटरी बी.ए.आय महाराष्ट्र जी. के. देशमुख, खजिनदार बी.ए. आय महाराष्ट अमर बिराजदार, व्हाईस चेअरमन संतोष कलकुटगी, सेक्रटरी जयसिंग साळुखे, जाईन सेक्रेटरी एम. बी जाधव, खजिनदार शशिकांत बेदरकर यांचा पदग्रहण समारंभ सोलापूर जिल्हयाचे पालक मंत्री ना. दत्तात्रय भरणे व इतर मान्यवराच्यां प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. बी.ए.आय. चे भारत देशात असून २०० हून अधिक शाखा असून ४० हजार सभासद कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्रात २८ शाखा असून ६००० सभासद कार्यरत आहेत. भारत देशात सन १९४१ साली या संस्थेची स्थापना इंजिनिअर जॅक्सन यांनी पुणे येथे केली. बिल्डर्स व कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या विविध प्रश्नावरती, अडचणी वरती मार्ग काढण्याकरीता या संस्थेची स्थापना झाली. सध्या भारत देशातील ही सर्वात मोठी संस्था म्हणुन गणली जाते. सोलापूर शहर जिल्हयातून या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व कामगार उपयोगी असे कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. उदा. बिल्डर्स डे, ब्लड डोनेशन कॅम्प, इंजिनिअर्स डे, लेबर हेल्थ कॅम्प व लेबर सुरक्षा सप्ताह असे विविध कार्यक्रम घेतले जातात. येणाऱ्या काळात लेबर प्रशिक्षण शिबीर, कामगारांकरीता ई श्रम कार्ड व कामगार कार्ड नोंदणी व वाटप शिबीर, बिल्डर्स द इंजिनिअर्स करीता जी. एस. टी. मार्गदर्शन शिबीर वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप असे विविध समाज उपयोगी कार्य क्रम घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न सर्व स्तरावरुन वेळोवेळी केला जातो. याच शाखेच्या कार्यातर्गत सोलापूर कॉन्ट्रॅक्टर्स नागरी सह. पतसंस्था मर्यादित या संस्थेचे कार्य चालु आहे. चालु वर्षी तांत्रिक व अन्य बांधवान क्षेत्राची माहिती असलेली वेब साईट चालु करणार आहोत. तसेच सध्या बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत ते नियंत्रित ठेवण्याकरीता बी.ए. आय. विविध स्तरावरती प्रयत्न करणार आहे. अशा या संस्थेचा पदग्रहण समारंभ होत असून शहरातील

               सर्व पक्षिय आमदार, प्रमुख प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक व इतर प्रतिष्ठित संघटनांच्या मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलले आहे.

               बैठकीला आणि स्थापना समारंभाला संपूर्ण महाराष्ट्रातील BAI चे सदस्य उपस्थित राहतील. यामध्ये मुख्य म्हणजे कार्यकारी अधिकारी, संचालक, व्यवस्थापकीय भागीदार, स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम आणि रिअल इस्टेट बांधकाम कंपन्यांचे संचालक असतील. तसेच शासकीय स्थापना समारंभासाठी सरकारी संस्थातील उच्चपदस्थ अधिकारी ही उपस्थित असतील. या समारंभाला अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रेय भरणे असतील, तसेच आ. सुभाष देशमुख, आ. यशवंत माने, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments