भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचा राज्यस्तरीय वर्धापन दिन टेंभुर्णी येथे साजरा


टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाची भ्रष्टाचाराच्या माध्यमातून होणारी पिळवणूक थांबून भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न करून संघटनेचे नाव राज्यभर करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आव्हान भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास सातपुते यांनी केले.
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश या संघटनेचा राज्यस्तरीय वर्धापन दिन २९ मे रोजी दुपारी १ वाजता टेंभुर्णी येथील संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळेत पार पडला. या वर्धापन दिनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून कैलास सातपुते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब कांबळे, अंबादास शिंदे, ॲड.अरविंद आंबेडकर, कैलास रजपूत, डॉ. कल्याण घोडके, डॉ. मनीषा गुरव, माधुरी पाटील अधिक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सातपुते म्हणाले संघटनेच्या माध्यमातून विनाकारण कोणालाही टार्गेट करू नका. तुम्ही दुसऱ्याला टार्गेट कराल तर, तुम्हाला कुणीतरी टार्गेट करेल, त्यामुळे खरोखर जिथे भ्रष्टाचार होत असेल त्याच्या विरूद्ध लढण्याची तयारी ठेवा. मी माझ्या जीवनामध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. नव्हे, तर जीवावर बेतण्याची सारख्या घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या आहेत. मी अशा घटनांमुळे अजिबात डगमगलो नाही. तेव्हा तुम्ही चांगले काम करत राहा ,तुमचे चांगलेच होणार आहे. हे विसरू नका. भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश ही संघटना अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणार आहे. असे सांगून अनेक घडलेल्या घटनांचे दाखले देत पदाधिकार्यांचे मनोबल वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी कुर्डूवाडी नगर पालिकेचा भ्रष्टाचार बरोबर विविध प्रकारचे आलेले भ्रष्टाचाराचे दाखले त्यांनी दिले यावेळी अंबादास शिंदे, अरविंद आंबेडकर, कैलास रजपूत, कल्याण घोडके, मनीषा गुरव, मनीषा पाटील, केशव लोखंडे, आदींनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संतोष कांबळे, रविंद्र हनवते ,हरिश्चंद्र कांबळे, बाबासाहेब कांबळे, अनिल ठोंबरे, सचिन खैरमोडे, अमोल चिकणे, अमोल सोळंके, रघुनाथ आंबेडकर, रोहन लोंढे, राजाभाऊ शेंडे विजय थोरात, रुक्मिणीताई गिरी, कल्पनाताई गिड्डे, सरिता बामणे मॅडम आदी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या जिल्ह्यातून पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुरिता झगडे यांनी केले तर नागरे सर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment