यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
.png)
मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाले आहेत. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.अंदमान समुद्रावर पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये दक्षिण द्विपकल्प आणि आग्नेय अरबी समुद्रामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षातील मान्सून या आठवड्यामध्ये अंदमान बेटावर दाखल होणार असून जुनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
यावर्षी मान्सून 13 मे ते 19 मे म्हणजेच वेळेअगोदर दाखल होणार आहे. तसेच 20 ते 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.दरम्यान, सध्या असनी चक्रीवादळाचे देखील संकट आहे. आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील काही भागांवर असनी चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
0 Comments