Hot Posts

6/recent/ticker-posts

११ ते २२ मे दरम्यान 'चला मुलांनो उजेडाकडे' ही मोहीम राबवली जाणार

११ ते २२ मे दरम्यान 'चला मुलांनो उजेडाकडे' ही मोहीम राबवली जाणार

               सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून ११ ते २२ मे दरम्यान आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने 'चला मुलांनो उजेडाकडे' ही मोहीम राबवली जाणार आहे.या मोहीमेत ० ते १८ वयोगटातील मुलांची दृष्टीदोष तपासणी केली जाणार आहे.कोरोना काळात बहुतांश मुलांच्या शाळा या ऑनलाईन पध्दतीने सुरु होत्या. त्यामुळे मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढलेले होते.याचा परिणाम मुलांच्या डोळयावर होऊन मुलामध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक व जिल्हा अंधत्व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत जिल्हयातील ९ लाख ६३ हजार ८२९ मुलांपैकी ज्या मुलांच्या दृष्टीदोषाची लक्षणे आहेत. त्यांची दृष्टीदोष तपासणी करण्यात येणार आहे.हा उपक्रम जिल्हयातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र,१४ ग्रामीण रुग्णालये,३ उपजिल्हा रुग्णालये स्तरावर मुलांची दृष्टीदोष तपासणी नेत्रशल्यचिकित्सक डॉ. गणेश इंदुरकर तसेच २४ नेत्र चिकित्सा अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. महापालिका स्तरावर आरोग्य अधिकारी डॉ.बसवराज लोहारे,नेत्रशल्यचिकित्सक डॉ. तन्वंगी जोग,तसचे आरोग्य तपासणीच्या चार पथकांकडून तपासणी केली जाणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments