केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केलेले कुटुंब आराेग्य सर्वेक्षण चुकीचे
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केलेले कुटुंब आराेग्य सर्वेक्षण चुकीचे आहे. त्यातील जैन समाजासंदर्भात केलेला उल्लेख चुकीचा आणि निषेधार्ह आहे. शाकाहाराचा पुरस्कार करणारा जैन समाज. लोकांना मांसाहारापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नशील असतो. असा समाज मांसाहारी होऊ शकत नाही. केंद्राने कधी, कोठे, कसा सर्व्हे केला याचा तपशील जाहीर करावा. सर्व्हे त्वरित मागे घ्यावा, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली.जैन समाज दुसऱ्यांना शाकाहारीकडे नेणार आहे.प्रयत्न केला जातोय.प्राण्याचे जीव वाचवण्यासाठी चळवळ सुरू असताना त्यांना मारून मांसाहार कसा करू शकता. केंद्र सरकारने हा केलेला सर्व्हे चुकीचा आहे. तो सर्व्हे सरकारने सविस्तर आमच्यासमोर मांडावा, म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल. केलेला सर्व्हे त्वरित मागे घेऊन सरकारी संकेतस्थळावरून काढून टाकावा.असे '' श्याम पाटील, भारतीय जैन संघटना यांनी सांगितले.
0 Comments