अवकाळी पावसामुळे फळांच्या दरात मोठी घसरण
.png)
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- अवकाळी पावसामुळे फळांच्या दरात मोठी घसरण आली आहे. शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या कलिंगड, खरबूज या फळांचे ग्राहकाअभावी लिलाव झाले नाहीत. फळांची विक्रीच न झाल्यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. डाळिंब व जांभूळ वगळता इतर सर्व फळांचे दर गेल्या चार दिवसांत गडगडले आहेत.उन्हाळ्यात फळांना मोठी मागणी असते. यामुळे अल्प कालावधीतील कलिंगड, खरबूज फळांचे उत्पादन घेण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा असतो. यावर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे सुरुवातीला फळांचे दर वधारले. त्यातच मार्च एप्रिल महिन्याच्या दरम्यान असलेल्या रमजानच्या उपवासामुळे यावर्षी फळांचे दर टिकून राहिले. सध्या बाजारात कलिंगड खरबूज सह आंबा, द्राक्षे,पेरू,पपई,चिकू,डाळिंब,फळांची आवक सुरू आहे.गेल्या चार दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब वगळता सर्व फळांचे दर उतरले आहेत.मात्र मे महिन्यात निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे दर घसरणीला सुरुवात झाली.फळांचा राजा म्हणून गणला जाणारा आंब्याचे भाव कमी झाला आहे.
0 Comments