Hot Posts

6/recent/ticker-posts

शहरात चोरी, घरफोडी, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेश पायलट नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम

शहरात चोरी, घरफोडी, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेश पायलट नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात चोरी,घरफोडी,ऑनलाइन फसवणूक,मोटारसायकल चोरी,दागिने हिसकावणे अशा घटनांत वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेश पायलट चौकातील गणेश मंदिरात सोमवारी सायंकाळी नागरिकांसाठी जनजागृती करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.पोलिस निरीक्षक राजन माने, सहायक निरीक्षक रोहित चौधरी, फौजदार कुकडे व अन्य अधिकारी यांनी चोरी, घरफोडी रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी. सुरक्षेच्या दृष्टीने कसे सावध राहावे? याबाबत मार्गदर्शन केले.परगावी जाताना घरात दागिने व पैसे, मौल्यवान वस्तू ठेवू नका. बँकेच्या लाॅकरमध्ये ठेवा. सोसायटी, काॅलनीत सुरक्षारक्षक नेमा, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या, फसवणूक होणार नाही, याबाबत दक्षता घ्या. दागिने व पैशाबाबत काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोलिस हवालदार काशिनाथ वाघे, सुभाष मुंडे, राकेश पाटील यांनी नियोजन केले.चोरी, घरफोडी रोखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी नागरिकांना जनजागृतीसाठी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित मान्यवर.

Reactions

Post a Comment

0 Comments