Hot Posts

6/recent/ticker-posts

दर वाढी वरून रिक्षाचालक झाले आक्रमक

दर वाढी वरून रिक्षाचालक झाले आक्रमक

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर इंधनाचे दर वाढलेले असताना दरवाढ होत नसल्याने ऑटो रिक्षाचालकांकडून वर्षभरापासून मागणी होत होती. अखेर यावर मंगळवारी दुपारी सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थित रिक्षाचालकांची बैठक झाली.यात ३० टक्केप्रमाणे किलोमीटरला २२ रुपये मागणी असताना दीड किलोमीटरला १८ रुपये वाढ करून प्रशासनाने बोळवण केल्याने रिक्षाचालक या आक्रमक झाले.त्यांनी दरवाढीबद्दल परिवहन प्राधिकरणाचा निषेध केला. सोमवारी आरटीओच्या उपस्थितीत सन्मानजनक तोडगा न निघाल्यास आदेशाची होळी करून आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्याने सहा.उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिक्षाचालकांनी सन २०१२ पासून दरवाढ झालेली नाही.पूर्वी प्रतिकिलोमीटर १२ रुपये अशी दरवाढ होती. हकीम समितीने महागाई निर्देशांकानुसार दरवाढ करावी,अशी शिफारस केली आहे. सोलापूरसाठी ही दरवाढ ३० टक्क्यांप्रमाणे २२ रुपये अपेक्षित असताना परिवहन प्राधिकरणाने अगोदरचे १२ रुपये आणि त्यात केवळ ६ रुपये वाढ करून १८ रुपये दरवाढ करताना त्यात अर्धा किलोमीटरची वाढवून तुंटपुजी वाढ केली आहे.ही वाढ सध्याच्या महागाईच्या निर्देशांकानुसार अन्यायी असल्याबद्दल रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला.दरवाढ होईपर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा लाल बावटा ऑटो रिक्षाचालक संघटनेचे जनरल सेक्रेटरी सलीम मुल्ला यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments